Monday 8 May 2017

Smart उत्तरं...

Rent , WiFi आणि मेस ..!

पाण्यासारखीच गंध ,चव नसलेली तरीपण जगण्यासाठी पाण्याइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा.'पैसा' ह्या एका गोष्टीमुळे इतिहासात खूप मोठ्या घटना घडल्या आहेत, आजही होतात आणि भविष्यात पण होत राहणार. त्यामुळे त्याचं वेगळं महत्त्व सांगायची गरज नाही. आज खूप संख्येने विद्यार्थी वेगवेगळ्या शहरात राहतात. मुख्यतः शिक्षणासाठी. शिक्षणानंतर नोकरीसाठी आणि बरेच जण लग्न वगैरे करून तिथेच स्थायिक पण होतात. हा शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत चा काळ साधारण ५-७ वर्षांचा असतो. ह्या काळात बऱ्याच गोष्टी बदलतात. राहणीमान खाण्या पिण्याच्या सवयी, बोलण्याची पद्धत,आवडी निवडी,महागाई अशा आणि इतर गोष्टी. पण एक गोष्ट जी बदलत नाही ती म्हणजे घरच्यांकडून पैसे मागण्याची कारणं, ती म्हणजे rent,wi-fi आणि मेस.
घर सोडून दुसऱ्या शहरात राहाताना पैशाची चणचण फार लवकर जाणवायला लागते. पहिल्यांदा घर सोडताना घरच्यांच्या हजार सूचना असतात. त्यात सर्वात महत्वाची आणि बहुदा शेवटची म्हणजे 'दररोज हिशोब लिहा',आणि सोबत आग्रह करून छोटी डायरी पण दिली जाते. आपण सुद्धा ती डायरी आणि सूचना 'नव्याचे नऊ दिवस' ह्या म्हणी प्रमाणे तंतोतंत पाळतो. नंतर मात्र आळस हा आपला मित्र होतो का बँकेपेक्षा सुरक्षित असा vault आपल्या डोक्यात तयार होतो कोण जाणे. त्या डायरी मध्ये पैश्याऐवजी धुळीचा हिशोब जमा होऊ लागतो आणि आता अजून एक म्हण खरी होऊ पाहते. ती म्हणजे आपल्या खर्चाला 'शिंग फुटायला लागतात'. छोटे छोटे खर्च , काही मोठे खर्च . हे खर्च आपण घरी सांगू शकत नाही. आणि त्यांची नोंद ठेवणारा तर धाडसीच असावा. मग हक्काची माणसं किंवा हुकुमाची पानं ह्याप्रमाणे मदतीला येतात rent,wi-fi आणि मेस. "अहो बाबा नोटाबंदी मुळे मालकानी २ महिन्याचं भाडं मागितलंय" , "अगं ताई wi-fi चा प्लॅन बदललाय त्यामुळे पैसे जास्त लागले " , " आई अग जेवण खराब होतं मग मेस बदलली ,थोडे पैसे पाठव ना . " आता ह्या सगळ्या मध्ये कोणाची चूक यासाठी हा पानभर अट्टाहास नाही. जशा आजच्या बातम्या त्याप्रमाणेच ही एक आजची परिस्थिती.

No comments:

Post a Comment

Disarray

Sound of an old wise man, Light of a dusty table lamp, Smell of an unvisited house, Blurb of a prolonged unread book, Meaning of the abstrac...