Wednesday 3 May 2017

ती..

नाव वाचून जवळ जवळ सर्वांनाच वाटलं असेल एखादया तथाकथित गोष्टीप्रमाणे 'ती' म्हणजे माझी किंवा एका पात्राची (हिरोची) प्रेयसी किंवा अजून काही. पण मराठी व्याकरणात जसे स्त्रीलिंगी नावासाठी , वस्तूसाठी ती हे सर्वनाम वापरले जाते तसेच एक सर्वसाधारण सर्वनाम म्हणून 'ती' हे वापरले आहे. आजकाल आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींना फार जास्त महत्व देतो. त्यांना लगेच click करून घेतो. आपल्या जवळ ठेवतो. पण त्यामुळे कधी कधी त्याची मजा निघून जाते. कधीतरी मित्रांशी बोलता बोलता विषय पटापट भरकटावे आणि अचानक शाळेचा विषय निघाल्यावर "अरे 'त्या' teacher आठवतात का?" अस म्हणल्यावर मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद,उत्सुकता,कुतूहल,राग  हे  जे काही एकत्र येतं ना त्यात खरी मजा आहे. आता त्या teacher म्हणजे खरंतर कोणीतरी 'ती' असते. आपल्याकडे त्यांचा कोणता फोटो किंवा इतर वस्तू नसते. तरीपण सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असतात. अशा कितीतरी आठवणी आपल्या मनाच्या संग्रहात दडून असतात. आणि  खजिना सापडावा तशा कधीतरीच आठवतात. 'ती' एखादी jeans, 'ती' गाडी, क्रिकेट match मधली 'ती' ओव्हर, 'ती' खूप गोड कॉफी, रडू आणणारी 'ती' assignment, पतंगांची 'ती' पेज, कोणाची तरी 'ती' हाक, 'ती' बॅग, 'तो' दिवस, 'तो' खुप दुखणारा दात, सर्वात जास्त टिकलेला 'तो' चष्मा, 'तो' लकी शर्ट, बोर्डाचा 'तो' पेपर, कंटाळा आलेलं 'ते' आजारपण, 'ते' भांडण, game मधलं 'ते' mission. आपल्या अशा कितीतरी आठवणी असतात. आठवाव्या तर अजिबात आठवत नाही. मन हे एक अजब रसायन आहे. शेवटी माणूस म्हणलं कि मन आलं, मन म्हणलं कि प्रेम आलं, आणि प्रेम म्हणलं कि 'ती' आलीच.

No comments:

Post a Comment

Disarray

Sound of an old wise man, Light of a dusty table lamp, Smell of an unvisited house, Blurb of a prolonged unread book, Meaning of the abstrac...