Saturday, 20 October 2018

भडिमार Day...

सर्वप्रथम वाचकांना " जागतिक भडिमार day " च्या शुभेच्छा. आपल्या इथे सर्वमान्य अशा खूप कमी गोष्टी आहेत. आणि त्यामधली एक म्हणजे भडिमार day. आजच्या इंटरनेटच्या जगात भडिमार day ला फार महत्व आहे. एखाद्या गोष्टीचे महत्व लोकांना पटवून द्यायचे असल्यास किंवा वाढवायचे असल्यास त्या गोष्टीचा भडिमार day साजरा करावा आणि लगेच त्याचे महत्व समाजाला पटून जाते. एवढी साधी संकल्पना आहे भडिमार day ची. विशेष म्हणजे नियोजन पण अगदी सोपं आहे. प्रगतीमुळे किंवा नाईलाजाने आता प्रत्येकाकडे smart phone आणि त्यामध्ये whats app आहेच. झालं तर भडिमार day ची ही मुख्य सामुग्री आहे.
मग आता आपले mother, father, brother, sister.. इत्यादी स्नेहीजनांपासून सुरवात करावी भडिमार day साजरा करण्याची. वर्षानुवर्षे मनुष्य प्राणी हा निसर्गावर अतोनात प्रेम करत आलाय. आणि निसर्गानी आपल्यावर केलेल्या खऱ्या प्रेमाची परतफेड म्हणून nature, पर्यावरण, पाणी अशा अनेक गोष्टींचा देखील भडिमार day करावा. त्याचप्रमाणे मानवी भावभावना यांच्याबद्दल मुक्तपणे बोलण्याची मुभा भडिमार day च्या निमित्ताने नक्कीच आपल्याला मिळू शकते हे वाचकांनी लक्षात घ्यावे. यामध्ये हसणं आणि प्रेम आघाडीवर आहेत. 
सामाजिक विषयांना हात घालण्यासाठी आणि आपले विचार प्रगल्भ झालेत ( खरंच ?) हे दाखवण्यासाठी भडिमार day चा वापर उत्तमरीत्या होऊ शकतो. नजीकच्या काळात महिलांचा झालेला ( जास्तच ) विकास हा अशाच एका भडिमार day चा परिणाम म्हणायला हवा. आपल्या भडिमार day समोर " जागतिक " शब्दाची पुष्टी जोडल्यास आपल्या भडिमाराचा नमुना आंतराष्ट्रीय स्तरावर पोहचू शकतो किंबहुना पोहचवला जाऊ शकतो. काही व्यक्तींनी कष्ट, मेहनत घेऊन त्यांचे स्वतःचे जीवन सार्थकी लावले, त्यांच्याकडून काही आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जन्म/मृत्यू दिनाचा भडिमार day साजरा करण्यात आपल्याला अतिशय धन्यता वाटते. 
त्यामुळे आता तो भडिमार day दूर नाही ज्या दिवशी आपल्या स्वतःच्या वाढदिवसाचा जागतिक happy birthday होईल ..!

Disarray

Sound of an old wise man, Light of a dusty table lamp, Smell of an unvisited house, Blurb of a prolonged unread book, Meaning of the abstrac...